Housing news: गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेटच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असल्याचं बघायला मिळत आहे. तसेच मुंबईसारख्या शहरात हे दर अजूनच वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक जण म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असून, त्याद्वारे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत. चालू आर्थिक वर्षात म्हाडाच्या विविध विभागांकडून महाराष्ट्रात सुमारे 13,000 घरे बांधली जात आहेत.
2016 मध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीच्या (Housing news) संदर्भात हा निर्णय घेण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे 2016 मध्ये गोरेगाव येथील पत्रावळा प्रकल्पातील 306 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. दरम्यान, लॉटरीत मालमत्तेच्या किमती वाढविण्याबाबत म्हाडाचे मुंबई मंडळ निर्णय घेणार असल्याचे कळते.
त्यामुळे या लॉटरीतील विजेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. 2016 च्या या लॉटरी गृहनिर्माण प्रकल्पाचे काम प्रस्तावित बिल्डरने वेळेवर पूर्ण केलेले नाही. बिल्डरने हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला नसल्याने, जे लॉटरी विजेते आहेत त्यांना अजूनही या घरांचा (MHADA News) ताबा घेता आलेला नाही.
दरम्यान, ही घरे लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी विजेत्यांनी बोर्डावर दबाव आणला होता. म्हाडाद्वारे हा प्रकल्प विजेत्यांचा विरोध पाहता पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून इमारतीचे बांधकाम हे सध्याच्या घडीला शेवटच्या टप्प्यात आहे.
या घरांचे उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत विजेते या घरांचा ताबा घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे या लॉटरीतील विजेत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
7 ते 10 लाखांपर्यंत या किमती वाढवल्या जाऊ शकतात असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या संदर्भातील प्रस्ताव तयार असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी म्हाडाच्या व्हाईस चेअरमनसमोर मांडण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
म्हाडाच्या (Housing news) एका वरिष्ठ अधिकाऱ्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा तो खासगी बिल्डरकडून पूर्ण करून मिळणार होता. या आधारे लॉटरीत समाविष्ट घरांची किंमत ठरवण्यात आली होती, परंतु मंडळाने मोठा खर्च केला.
अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी मंडळाला अतिरिक्त पैसा खर्च करावा लागत आहे. या कारणास्तव मालमत्तांच्या किमती वाढवण्याचा विचार केला जात असल्याचं सांगितल जात आहे. निर्णयानंतर लवकरच घराची नवीन किंमत जाहीर केली जाईल. मात्र, विजेत्यांनी मंडळाच्या या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली असल्याचं बघायला मिळत आहे.
एकतर घरांचा ताबा मिळण्यास उशीर होत आहे आणि आता असही बोललं जात आहे की घरांच्या किमती वाढल्या जाणार आहेत. यामुळे विजेत्यावर अन्याय होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता म्हाडाचे (Housing news) मुंबई मंडळ यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
येथे वाचा – घर खरेदी करताय? थोडं थांबा! सरकारचा जनतेला मोठा दणका