आनंदाची बातमी! आता पीक कर्ज घेण्यासाठी ‘ही’ अट नसणार, आता तुम्हालाही मिळणार पीक कर्ज..!

Crop Loan : आता राज्यात जिकडे पहा तिकडे पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पेरण्यांच्या कामांना मोठा वेग आलेला आहे. या काळात शेतकरी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी कर्ज काढतात. बँका देखील शेतकर्‍यांना पीक कर्ज (Crop Loan) देतात. त्यामुळे शेतकर्‍यांना शेती कामासाठी आर्थिक अडचणी येत नाही. राज्यात बहुतांश लोक हे शेती हा व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकारकडून नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले जातात. आता देखील सरकारने शेतकर्‍यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांना पीक कर्ज (Crop Loan) मिळणे सहज आणि सोपे होणार आहे.

आता पीक कर्ज घेण्यासाठी ‘ही’ अट नसणार

बँक शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मोठी मदत करत असते. अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही बँकेकडून चांगले कर्ज (Loan) मिळावे, असे आव्हान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच पीक कर्ज देत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या सिबिल स्कोरबद्दल (Cibil Score) कोणतीही सक्ती करण्यात येऊ नये. तसेच राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण केले जावे, असा निर्णय बैठकीत घेतला आहे.

या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 जुलैपर्यंत जमा होणार पैसे! येथे क्लिक करून पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी

यंदा 2024-25 हंगामासाठी 41 हजार 286 कोटी एवढ्या रुपयांचा वार्षिक पत आराखडा देण्यास मान्यताही देण्यात आली आहे. आणि अजून महत्वाचं म्हणजे जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीला आरबीआय तसेच नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठविला जावा, अशी देखील सांगण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मते मांडली. या वेळी बैठकीला उपस्थित उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार आणि महसूल मंत्री विखे पाटील तसेच सहकार मंत्री वळसे पाटील आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्ये मांडले आहे.

खुशखबर! शेतकऱ्यांनो अखेर डबल कर्जमाफी झाली; नवी यादी जाहीर, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment