Soyabean rate: सोयाबीन हे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाचे पीक मानले जाते. सध्या शेतकरी सोयाबीनची लागवड करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, सोयाबीनची बाजारात आवक सुरूच आहे. लातूर बाजार समितीत आज सोयाबीनचा सरासरी भाव 4486 रुपये (Soyabean rate) होता.
दरम्यान, जुलै-सप्टेंबर या कालावधीमधे सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. भारताचा विचार केला तर 2023-2024 मध्ये सोयाबीनचे उत्पादन 110 लाख टन होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 11 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, मागील वर्षाच्या तुलनेत 2022-23 मध्ये स्वयं मिलच्या निर्यातीत वाढ झाली आहे. यावर्षी 23 एप्रिल ते 24 फेब्रुवारी या कालावधीमधे 19.34 लाख टन सोयाबीनची (Soyabean rate) निर्यात केली गेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये सोयाबीनची निर्यात या वर्षी अधिक वाढली असल्याचं बघायला मिळत आहे.
त्याचवेळी, नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीमधे 12.868 दशलक्ष टन सोयाबीन तेलाची आयात करण्यात आली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे, एसईएच्या अहवालातून समजून येत आहे. चालू वर्षाच्या बाजारात सोयाबीनची मासिक आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत, ऑक्टोबर महिन्यामधे अधिक होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून यामधे घट बघण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांच्या (Soyabean rate) किंमती
लातूरच्या बाजारपेठेचा विचार करता, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे भाव कमी आहेत. गेल्या तीन वर्षांतील जुलै-सप्टेंबर या कालावधीतील सरासरी किंमती पाहिल्यास, जुलै-सप्टेंबर 2021 मध्ये ही किंमत 7,783 रुपये प्रति क्विंटल होती, त्यानंतर जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये 5,384 रुपये प्रति क्विंटल आणि जुलै-सप्टेंबर 2023 मध्ये 4,876 रुपये प्रति क्विंटल इतकी किंमत होती.
पुढील चार महिन्यांसाठी अपेक्षित भाव
यावर्षी 2023-24 हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ही प्रति क्विंटल 4 हजार 600 रुपये आहे. मात्र सध्या लातूरच्या बाजारात सरासरी भाव फक्त 4 हजार 400 रुपये आहे. एकूणच गेल्या चार वर्षांत सोयाबीनच्या (Soyabean rate) दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यानुसार, जून-सप्टेंबर 2024 या कालावधीत अपेक्षित भाव 4, 400 रुपये ते 5,200 रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.
येथे वाचा – खूशखबर! अतिशय कमी किमतीत मिळतोय म्हाडाचा फ्लॅट.. ही संधी चुकवू नका..