Kisan News: शेतकऱ्यांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 40 कोटी रुपयांवर रोख येणार?

Kisan News: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात येत आहे. यामध्ये वादळ, पाऊस, गारपीट व इतर काही नैसर्गिक आपत्तींमुळे, पिकांचे जे काही नुकसान झालेले आहे त्याची भरपाई केली जाते.

या अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत आपल्या पिकांचा विमा उतरवलेले बाधित शेतकरी नुकसान भरपाईचा दावा करू शकतात. मात्र, विमा कंपन्यांच्या मनमानीमुळे (Kisan News) काही वेळा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास बराच उशीर केला जातो.

कंपनी शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम देण्यास विनाकारण विलंब करते आणि शेतकऱ्याचा दावा अडवून ठेवला जातो. या कारणाने (Kisan News) शेतकरी आपल्या दाव्यासाठी सतत विमा कंपनीला भेट देत राहतात. राजस्थानमधे असणाऱ्या सांचोर जिल्ह्यामधील चितलवाना या गावातही असाच एक प्रकार समोर आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांनो, आता तुमच्या खात्यात एकरकमी जमा होणार 2 लाख 10 हजार रुपये..

जिल्हाधिकाऱ्यांनी, ही बाब माध्यमांमध्ये समोर आल्यानंतर, त्या संबंधित विमा कंपनीला (Kisan News), जे शेतकरी बाधित झाले आहेत त्यांच्या 1944 विमा दाव्यांपैकी ४० कोटी रुपये हे पुढील तीन दिवसांत त्यांच्या खात्यात भरण्याचे निर्देश दिले आहेत. उचलण्यात आलेल्या या पाऊलामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.

पीक विम्याच्या दाव्यांमध्ये काय चूक आहे?

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 2020 ते 2022, रब्बी आणि खरीप हंगाम दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात विमा दाव्याची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. विमा कंपनीने (Kisan News) पीडित शेतकऱ्यांचे दावे थांबवले. हे करत असताना कंपनीने एक-दोन नव्हे तर तब्बल 1944 शेतकऱ्यांचे एकूण 40 कोटी रुपये रोखले होते. आता विमा कंपनीच्या फेऱ्या मारून सुद्धा शेतकरी चिंतेत पडले असल्याचं समजून येत आहे. ही बाब माध्यमांमध्ये आल्यानंतर जिल्हाधिकारी शक्तीसिंह राठोड यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कंपनीने तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर दाव्याची रक्कम वर्ग करण्याचे आदेश तातडीने दिले.

अरे देवा! आता फास्टॅग होणार बंद, स्वतः जाऊन भरावा लागणार टोल!

कोणत्या गावातून किती शेतकऱ्यांना विम्याचा दावा मिळणार?

2020 ते 2022 या तीन वर्षांसाठी विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांचे दावे रोखून धरले होते अशा शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी ओळख पटवली. बाधित शेतकऱ्यांची कागदपत्रे गावोगावी शिबिर लावून गोळा करण्यात आले, ज्यात राणीवाड्यातील 240, बगोरा या ठिकाणच्या 478, सांचोरमधील 339 आणि चितळवणमधील 887 शेतकऱ्यांचा समावेश आहे, ज्यांचे दावे विमा कंपनीने (Kisan News) रोखून धरले आहेत, मात्र आता त्यांना विमा कंपनीकडून हे द्यावे मिळू शकणार आहेत.

Leave a Comment