PM Awas yojana: आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवीन घरांची बांधणी, फक्त याच नागरिकांना मिळणार घर!

PM Awas yojana: मोदी सरकारद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती ही त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात वाढवण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत, या योजनेमधे, जास्तीच्या 3 कोटी कुटुंबांचा समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आली असून, ग्रामीण आणि शहरी भागात मिळून एकूण 3 कोटी जास्तीची घरे बांधण्यात येणार आहेत. एकूण 4.21 कोटी घरे गेल्या 10 वर्षांत पात्र गरीब कुटुंबांसाठी बांधण्यात आली आहेत.

भारत सरकार द्वारे (PM Awas yojana) 2015-16 पासून ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू कुटुंबांना, काही मूलभूत सुविधांसोबत, घरे बांधण्यासाठी मदत करण्याच्या उद्दिष्टाने प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येत आहे. गेल्या 10 वर्षांत PMAY अंतर्गत पात्र गरीब कुटुंबांसाठी एकूण 4.21 दशलक्ष घरे बांधण्यात आली असल्याचं समजून येत आहे.

सत्तेवर येताच सरकारची मोठी घोषणा, राज्यातील फक्त याच जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर..

केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर योजनांच्या मदतीने PMAY अंतर्गत बांधण्यात आलेल्या सर्व घरांमध्ये घरगुती शौचालय, वीज कनेक्शन, LPG कनेक्शन, यासोबतच घरगुती पाण्याचे कनेक्शन ह्या व यांसारख्या अनेक आवश्यक सुविधा देखील पुरवल्या जात आहेत.

PMAY अंतर्गत घर मिळण्यासाठी पात्रता

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PM Awas yojana) ज्यांच्याकडे कायमस्वरूपी घर नाही तेच कुटुंब पात्र आहेत. कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या नावावर कायमस्वरूपी घर नसावे. तसेच, कुटुंबातील कोणताही व्यक्ती राज्य किंवा केंद्र सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या कुठल्याही गृहनिर्माण योजनेचा लाभार्थी नसला पाहिजे. 3 लाख ते 6 लाख रुपये इतके कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असावे आणि बीपीएल शिधापत्रिका असणे हे त्या कुटुंबासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे.

अरे देवा! पीक विम्यामध्ये मोठे बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

प्रधानमंत्री आवास योजनेचे फायदे काय?

जी लोकं कच्चा किंवा तात्पुरत्या घरांमध्ये राहत आहेत, अशा लोकांना (PM Awas yojana) योजनेमुळे कायमस्वरूपी घरे मिळण्यास मदत मिळते.

जर एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल, तर त्याला या योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देखील घेता येऊ शकते.

या योजनेच्या (PM Awas yojana) अंतर्गत सरकारद्वारे गृहकर्जासाठी सबसिडी देण्यात येते. घराच्या आकारमानावर आणि उत्पन्नाच्या पातळीवर अनुदानाची ही रक्कम अवलंबून असते.

बँकांना कमी व्याजदरात गृहकर्ज देण्यास या योजनेअंतर्गत प्रोत्साहन देण्यात येते.

PMAY योजनेंतर्गत 20 वर्षे हा गृहकर्जाचा कमाल परतफेड कालावधी आहे.

Leave a Comment